हॉलीवूड चित्रपटांतील भारतीय व्यक्तिरेखा?

 "इनक्रेडीबल हल्क" मध्ये मिल्ट्रीपासून (रॉस पासून) नजर चुकवत पाच वर्षे ब्रूस बॅनर ब्राझीलमध्ये राहतो आणि बॉटल कारखान्यात काम करतो. राग आल्यावर मोठा आकार होऊन हल्कमध्ये रूपांतर होऊ नये यासाठी तो रागावर कंट्रोल करायला तो ब्राझीलमध्ये पोर्तुगीज भाषेत कपालभाती प्राणायाम शिकतो. तसेच त्याच्यावर झालेल्या गॅमा प्रयोगाचे अँटीडोट त्याला हवे असते जेणेकरून तो या मोठा आकार होऊन हल्क होण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळवू शकेल. त्यासाठी तो मिस्टर ब्लू शी चॅटिंग द्वारे संपर्कात असतो. पण कपालभातीच शिकायचे होते इतक्या दूर दक्षिण अमेरिकेत जायची काय गरज होती? त्यापेक्षा भारतात येऊन तो रामदेव बाबांकडून प्राणायाम शिकतो असे दाखवले असते तर ते आणखी योग्य झाले असते आणि त्याचा राग कायमचा गेला असता. त्यांनी त्याला सगळ्या प्रकारच्या प्राणायाम मध्ये एक्सपर्ट केले असते आणि अवेंजर्सचे चाहते मात्र हल्क नावाच्या सुपरहिरोला कायमचे मुकले असते.

अर्थात नंतर आणखी एकदा अवेंजर्स1 मध्ये ब्रूस बॅनर म्हणजे हल्क काही काळासाठी कोलकात्यात राहतो असे दाखवतात पण ते लपण्यासाठी, प्राणायाम शिकण्यासाठी नाही. नंतर एकदा आयरन मॅन पण भारतात येतो म्हणे!

तसे तर अवेंजर्स वगळता इतर चित्रपट जसे मिशन इम्पोसीबल 3 मध्ये भारतातील शूटिंग मध्ये अनिल कपूर पण दिसतो. आणि इरफान खान तर लाईफ ऑफ पाय, अमेझिंग स्पायडरमॅन मध्ये आणि दीपिका ट्रिपल एक्स नावाच्या अमेरिकन स्पाय चित्रपटात तर प्रियांका बे वॉच आणि अमेरिकन टीव्ही सिरीज क्वांटीको मध्ये आपल्याला "दिसते".

तसेच 2012 नावाच्या हॉलिवूडच्या चित्रपटात सतनाम नावाची व्यक्तिरेखा महत्वाची आहे ज्याच्यामुळेच अमेरिकेला कळते की प्रलय येणार आहे पण सुनामी येते तेव्हा त्याच्या अमेरिकन मित्राने भारतात त्याच्या मदतीला पाठवलेले विमान त्याला मिळतच नाही. असो. आठवायला बसले तर एकवरून दुसरे अशी अनेक उदाहरणे आठवतील. तुम्हाला आणखी काही आठवले तर जरूर कमेंट मध्ये सांगा.

२३ जुलै २०२०

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली