आंबा कसा डाऊनलोड करतात?
"पप्पा, आंबा कसा डाऊनलोड करतात?
"एक 1.5 gb साईजचा दगड घ्यायचा. तो 20gbps या स्पीडने आंब्याच्या दिशेने अपलोड केला की आंबा डाउनलोड होतो!"
"मग आंब्याच्या डाउनलोड स्पीड कसा ठरतो?"
"आंब्याचा डाऊनलोड स्पीड ठरवायचा अधिकार आपल्याला नाही. ते पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण ठरवते!"
"आणि पप्पा आंब्याचे झाड जमिनीत कसे काय इन्स्टॉल होते?"
"आंब्यातून जी बी निघते तिला कोय म्हणतात. ती जमिनीमध्ये थोडी मेमरी रिकामी करून इंस्टॉल करायची आणि त्याच्यावर अनेक सपोर्टिंग सॉफ्टवेअरचे पॅचेस वेळोवेळी इंस्टॉल करायचे जसे की सूर्यप्रकाश पाणी वगैरे!"
"आणि या मध्ये व्हायरस घुसला तर!"
"मग वेगवेगळ्या अँटीव्हायरसची फवारणी करायची!"
(नव्या पिढीच्या वाय फाय दृष्टिकोनातून)

Comments
Post a Comment