जुदाई आणि शोर शराबा



परदेशातील अति उंच बिल्डिंगवर हेलिकॉप्टर मधून सतत हलत्या कॅमेऱ्यातून शूटिंग केलेले जुदाई सिनेमातले "व्ही बाबा बाराब्बा" हे अनिल, उर्मिला, श्रीदेवी या तिघांचा 4 आकड्यावर एकत्रित अतरंगी डान्स असलेले गाणे योगायोगाने काही दिवसांपूर्वी माझ्या बघण्यात आले. तेव्हापासून एक लिहायचे राहून गेले होते. 

शोर शराबा आणि धांगडधिंगा असलेले हे गाणे अशा जुदाई चित्रपटातील आहे ज्यात एका कन्स्ट्रक्शन साइटवर उर्मिला प्रथम तुज पाहता (भेटता) अनिल कपूरच्या प्रेमात पडते त्याचे एक कारण म्हणजे ती जेव्हा त्याला विचारते की तुला कसल्या प्रकारचं म्युझिक आवडतं तर तो म्हणतो "ज्यादा शोर शराबा वाला म्युझिक मुझे पसंद नही, मैं शांत गजल क्लासिकल म्युझिक सुनता हूं!" (असाच काहीसा डायलॉग आहे, पूर्ण शब्द न शब्द मला आठवत नाही) आणि त्याच चित्रपटात स्वतः अनिल कपूरच्या वाटेला मी वर सांगितलेले शोर शराबा वाले धटिंग नाच गाणे आले आहे. 

आठवत नसेल तर तुम्हीही बघून पहा ते गाणं: "प्यार प्यार करते करते...व्ही बाबा बाराब्बा!" आणि विशेष म्हणजे तीच उर्मिला जिला शांत म्युझिक आवडतं आणि शांत म्युझिक आवडणारे लोकं आवडतात ती प्रेमात पडल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर परदेशातील रस्त्यांवर ओरडून ओरडून गाणे म्हणते, "मुझे प्यार हुवा प्यार हुवा..अल्लामिया!" ह्याला म्हणत्यात विसंगती, बालिवूड इस्टाईल!
😁

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली