रावणायन
इंद्रायणी सावकार यांचे रावणायन पुस्तक नुकतेच वाचून झाले. मला आवडले. खूप छान आहे. आपण सुध्दा जरूर वाचावे. एक वेगळीच अनुभूती आपल्याला हे पुस्तक वाचून मिळेल.
रावणाबद्दल एरवी माहिती नसलेल्या गोष्टी तर कळतीलच पण वाली सुग्रीव आणि तारा यांच्यातील खूपच पराकोटीच्या गुंतागुंतीच्या प्रेम त्रिकोणाचे अद्भुत आणि सतत दोलायमान होणारे खेळ यात वाचायला मिळतील. तसेच तारा आणि मंदोदरी यांच्यातील मैत्रीची कथा या यात प्रकर्षाने पुढे येते.
रावण मंदोदरी यांची प्रेमकथा आणि प्रेम विवाह कसा झाला हे सुध्दा यात आपल्याला कळते. विष्णुचे द्वारपाल जय विजय आणि राम रावण कुंभकर्ण यांचा काय संबंध आहे, तसेच सिता ही लक्ष्मी होती का, रावण आणि शंकर यांच्यातील संबंध, पिनाक आणि सारंग या धनुष्यांची कथा या सगळ्यांचा यात उलगडा होतो.
असा होता सिकंदर सारखीच इंद्रायणी सावकार यांची शैली नेहमीप्रमाणे वाचन आनंद वाढवते.
नक्की वाचा! रा व णा य न
पुस्तक वाचायला घेण्याआधी आधीचे राम रावणाबद्दलचे असतील नसतील ते पूर्वग्रह बाजूला काढून ठेवा किंवा पेटीत बंद करून कुलूप लावा आणि पेटी माळ्यावर ठेऊन द्या. पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही पुन्हा कधीही ती पेटी काढून कुलूप उघडणार नाहीत!
नक्की! :-)

Comments
Post a Comment