संवाद तोडकर



पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मध्ये असे लोक आपल्याला नेहेमी भेटतात की जे आपण त्यांना काही सांगत असताना आपले वाक्य मध्येच तोडून लगेच बोलायला लागतात आणि प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात.

त्यांच्या त्या प्रतिक्रियेवरून आपल्याला जाणवू लागते की थोडेसे का होईना पण जेवढे काही त्यांनी आपल्याला बोलू दिले, तेवढे सुद्धा त्यांनी नीट ऐकले नसावे आणि ऐकले असले तरी बरेचदा आपल्या म्हणण्याचा अर्थ त्यांनी सोयीस्करीत्या त्यांना हवा तसा लावलेला असावा.

असा प्रकार हा कोणत्याही संवादात किंवा चर्चेत फारच मोठा अडथळा आणतो. अशाने संवादाचा उद्देश्य साध्य होत नाही आणि मग समोरच्याच्या मनात अशा लोकांबद्दल पूर्वग्रह बनतो आणि नंतर नंतर चर्चेत यांचे मत कुणी विचारात घेईनासे होते.


का बरे बोलताना आपल्याला मध्येच काही लोक तोडतात आणि स्वतःच बोलायला लागतात?

याचे कारण असे आहे की: ज्या विषयावर संवाद किंवा चर्चा चालू आहे त्या विषयावरचे त्यांचे जे आजपर्यंतचे मत बनलेले असते म्हणजे पूर्वग्रह असतो (जो बरोबर किंवा चुकीचा सुध्दा असू शकतो) तो त्यांना बदलायचा नसतो.
समोरच्या व्यक्तीकडून काहीतरी नवीन मुद्दा आल्यास तो बरोबर असला तरी स्वीकारायचा नाहीच असे चर्चा सुरू व्हायच्या आधीच त्यांनी मनोमन ठरवेलेले असते. म्हणजे ते open minded नसून close minded असतात. म्हणजे आपल्या मनातील ठराविक मतप्रणाली पेक्षा किंवा पूर्वग्रदूषित विचारांपेक्षा वेगळा विचार असूच शकत नाही अशी त्यांची धारणा असते. नव्या विचारांसाठी त्यांनी आपल्या Mind ला Lock करून टाकलेले असते!

तसेच आणखी एक कारण असू शकते की त्यांना समोरच्या व्यक्तीबद्दल अढी असू शकते त्यामुळे समोरच्याचे ऐकायचेच नाही असे त्यांनी ठरवले असते त्यामुळे त्याचे ऐकण्याआधीच ते आपले ठाम मत थोपवून मोकळे होतात. मग समोरचा पुढे काही बोलतच नाही आणि संवाद किंवा चर्चा तिथेच थांबते!!

काय वाटते आपल्याला? आपले मत यावर जरूर कळवावे! 

I am "open" for listening to new opinions from everyone on this topic!!

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली