पडक्या बंगल्यातील रात्र
विराज आणि त्याचे चार मित्र – अजय, रोहित, राजेश आणि तन्वी – एका लांब पावसाळी ट्रिपवर कारने निघाले होते. त्यांच्या प्रवासादरम्यान, रात्री अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. रस्ता पूर्णतः अंधारात आणि पावसात बुडाला होता. ते दुपारी जवळच्या शहरातून निघाले होते आणि रात्री दहा साडेदहा वाजेपर्यंत आपण सहज हील स्टेशनवर पोहोचू असे त्यांना वाटत होते, परंतु अनपेक्षितपणे आलेल्या त्या पावसाने त्यांचे अंदाज चुकीचे ठरवले आणि ज्या गोष्टीची भीती होती तेच झाले. त्यांची कार झटके देऊन एका आडमार्गावर बंद पडली. या मार्गावरून यापूर्वी ते कधी गेले नव्हते, परंतु या वेळेस शॉर्टकट म्हणून ते या छोट्या रस्त्याने निघाले होते. तशातच जोराचे वादळ सुरू झाले. विराज आणि रोहित यांना गाडीच्या इंजिनची थोडीफार कल्पना होती त्यामुळे त्यांनी गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडी दुरुस्त झाली नाही. शेवटी गाडीचे दरवाजे बंद करून आपापल्या सॅक घेऊन ते चालू लागले. चालत जाऊन पुढे त्यांना एक पडका बंगला दिसला. पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी त्या बंगल्यात रात्रभर थांबायचे ठरवले. विशेष म्हणजे एकाच्याही मोबाईलला सिग्नल येत नव्हता. सकाळ...

Comments
Post a Comment