सर, मी बँकेतून बोलते!
आपण जरी कितीही चिडलो, रागावलो किंवा शांतपणे सांगितले की, "पुन्हा कॉल करू नका" किंवा अगदी काही प्रतिक्रियाच दिली नाही तरीही पुन्हा पुन्हा टेलि-मार्केटिंग वाले वेगवेगळ्या नंबर्सवरून आपल्याला कॉल करतच राहतात. आपण फोन ठेऊन दिला तरीही ते कॉल करतातच!
तो त्यांचा जॉब आहे हे खरे असले तरी आजकाल खरोखर एखाद्या फायनान्स कंपनी किंवा बँकेतून कॉल येण्याऐवजी कुणीतरी फसवण्याच्या उद्देशाने आपल्याला कॉल करण्याची शक्यताच जास्त वाढली आहे. माझे यासंदर्भातले अनुभव येथे शेअर करत आहे.
Part 1 -
आज तिने पुन्हा मला कॉल केला आणि म्हणाली,
आज तिने पुन्हा मला कॉल केला आणि म्हणाली,
"सर, मी kdfc मधून बोलतेय!"
मध्येच तिला थांबवत मी म्हणालो,
"ठीक आहे! तू kdfc मधून बोलतेस, तर मी पण ycici मधून बोलतोय! बोल, काय पाहिजे तुला? क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, होम लोन, कार लोन, ycici बँकेत नोकरी, फ्रेंडशिप?"
समोरून फोन कट्!
Part 2-
अनेकदा नाही सांगूनही तिने कॉल करणे चालूच ठेवले.
Part 2-
अनेकदा नाही सांगूनही तिने कॉल करणे चालूच ठेवले.
आज मी शेवटी तिला शक्य तितक्या शांत सुरात म्हणालो,
"हे बघ! तू रोज दिवसातून केव्हाही कॉल करतेस! बरोबर?"
"हो सर!", ती म्हणाली.
"रोज न चुकता करतेस! बरोबर?"
"हो सर!"
"आणि प्रत्येक कॉल बहुतेक वेगवेगळ्या नंबर वरून करतेस!", मी पुन्हा प्रश्न विचारला.
"हो सर! हो हो सर!", ती उत्साहाने म्हणाली.
"बरेच वेळा मी कॉल उचलत नाही आणि एखादेवेळा उचललाच तर तुमच्या ऑफर मला नकोत असे मी दर वेळेस सांगतो की नाही?"
"हो सर!"
"मग आपण त्यापेक्षा असे करूया का? दिवसातील एक वेळ ठरवून ठेवूया. रोज त्यावेळेस मला आठवण ठेऊन कॉल करत जा म्हणजे मी कॉल उचलतच जाणार नाही! आहे की नाही सोप्पी आयडिया!"
पलीकडून बराच वेळ सायलेन्स! आणि नंतर मी कॉल कट् केला.
Part 3 -
गेले काही दिवस झाले, मला एक कॉल येतो आहे की सर मी टॅक्सिस बँकेतून बोलतेय आणि मी एवढे ऐकून कंटाळून प्रतिक्रिया न देता फोन कट् करतो आहे आणि तो नंबर "ट्रू कॉलर" मध्ये स्पॅम म्हणून टाकून ब्लॉक करतोय. तरीही रोज नवीन नवीन नंबरवरून कॉल येत आहेत.
आज पुन्हा एका नव्या नंबरवरून कॉल आला आणि फोनवरची ती म्हणाली,
"सर, मी टॅक्सिस बँकेतून बोलतेय" हे ऐकून मी कामाच्या गडबडीत असल्याने फोन कट् करणार तेवढ्यात मला काहीतरी सुचले.
आणि मी तिला उलट प्रश्न विचारला,
"तुम्ही टॅक्सिस बँकेच्या कोणत्या शहरातील कोणत्या ब्रँचमधून बोलत आहात?"
हा अनपेक्षित प्रश्न ऐकून तिने गोंधळून अं अं अं केलं, तिची बोलती बंद झाली आणि तिने फोन ठेवून दिला.
याचाच अर्थ हा फ्रॉड कॉल होता आणि बहुतेक अशा प्रकारचे 80 टक्के कॉल फ्रॉडच असतात.
लोन पाहिजे का, क्रेडिट कार्ड घ्या, तुमच्या पॉलिसीबद्दल हा सर्व्हिस कॉल आहे वगैरे वगैरे!!
इंटरनेट, वेबसाईट आणि अँड्रॉइड मोबाईल ऍपच्या जमान्यात टेलिमार्केटिंगच मुळात कालबाह्य व्हायला हवे. निदान बँक आणि फायनांस क्षेत्रातील तरी!
सरकारने यासंदर्भात काहीतरी पावले उचलून कठोर कायदे करायला हवेत. कारण अशाप्रकारे फोन करून माहिती विचारून बँकेतून, क्रेडिट डेबिट कार्डातून पैसे चोरण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. \
आणखी एक प्रश्न उरतोच म्हणजे आपले फोन नंबर्स या चोर लोकांना देते कोण?
Part 4 -
एकदा मला फोन आला.
"सर हम जुजू बात कर रहा हूं, कैसे है आप?"
हा कोण नवीन अनोळखी उपटसुंभ? वेळी अवेळी मला कॉल करुन माझी ख्याली खुशाली विचारतो आहे.
"मी ठीक आहे बाबा, पण तू कोण आहेस ते सांग आधी?"
"माझ्याकडे एक स्कीम आहे तुमच्या फायद्यासाठी सर!"
"अरे वा. किती काळजी आहे तुला माझ्यासारख्या अनोळखी माणसाची आणि त्याच्या फायद्याची? पण मला आधी सांग जुजुभाई, तू कुठून बोलतोस मित्रा?"
"सर, threat बँक."
"threat बँक? ग्रेट! कोणती branch?"
हा कोण नवीन अनोळखी उपटसुंभ? वेळी अवेळी मला कॉल करुन माझी ख्याली खुशाली विचारतो आहे.
"मी ठीक आहे बाबा, पण तू कोण आहेस ते सांग आधी?"
"माझ्याकडे एक स्कीम आहे तुमच्या फायद्यासाठी सर!"
"अरे वा. किती काळजी आहे तुला माझ्यासारख्या अनोळखी माणसाची आणि त्याच्या फायद्याची? पण मला आधी सांग जुजुभाई, तू कुठून बोलतोस मित्रा?"
"सर, threat बँक."
"threat बँक? ग्रेट! कोणती branch?"
"K M Road branch सर!"
मी एकदम उसळून म्हणालो, "अरे, क्या बात है? मी पण त्याच ब्रांच मध्ये काम करतो!"
तो थोडा गडबडून म्हणाला, "क्या?"
"हां, कौनसे floor पे हो तुम? मैं 7 नंबर के क्युबिकल मे बैठा हुं. तुम्हारी शर्ट कौनसे कलर की हैं? मेरी व्हाईट शर्ट हैं, कर्ली हेयर! ये देखो मैने हाथ उपर किया है, पीछे देखो तुम्हारे, इधर, अरे उधर नही इधर...!"
तो इतका ओशाळला की त्याने कॉल कट केला!
Part 5 -
परत एकदा तिने कॉल केला.
"सर, पॉलिसी घ्या ना!"
"घेतो ना. आधी तुम्ही आमच्याकडून भिंडोलेक्सच्या 4 पाण्याच्या टाक्या विकत घ्या. आमचा पाण्याच्या टाक्यांचा बिझीनेस आहे."
"नाही सर! आम्ही असे करु शकत नाही! तुम्हाला मी पॉलिसी संदर्भात कॉल केला आहे!
"आधी पाण्याची टाकी, मग पॉलिसी!"
फोन कट!
"सर, पॉलिसी घ्या ना!"
"घेतो ना. आधी तुम्ही आमच्याकडून भिंडोलेक्सच्या 4 पाण्याच्या टाक्या विकत घ्या. आमचा पाण्याच्या टाक्यांचा बिझीनेस आहे."
"नाही सर! आम्ही असे करु शकत नाही! तुम्हाला मी पॉलिसी संदर्भात कॉल केला आहे!
"आधी पाण्याची टाकी, मग पॉलिसी!"
फोन कट!


Comments
Post a Comment