चीज चिली गार्लिक ब्रेड

साहित्य: लसूण, चीज, बटर, सिमला मिरची, हिरवी मिरची, ब्रेड

लसूण सोलून त्याचे अतिशय छोटे तुकडे करून बटरमध्ये मिक्स करा. त्यात भरपूर चीज किसून टाका. सिमला मिरचीचे छोटे तुकडे आणि हिरव्या तिखट मिरचीचे छोटे चौकोनी तुकडे करून त्यात टाका. हे सगळे मिश्रण हाताने किंवा चमच्याने मिक्स करून ठेवा.

शक्यतो जाड मोठा ब्रेड घेऊन तव्यावर एका साईडने थोडे बटर टाकून भाजून घ्या. भाजलेल्या बाजूवर वरील पेस्ट किंवा मिश्रण पसरवा. मग उरलेली बाजू बटर लावून तव्यावर भाजा. झाले चीज चिली गार्लिक ब्रेड तयार!!

यात मिरची नाही टाकली तरी चालते. मग तो बनतो चीज गार्लिक ब्रेड.

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली