नात्यातले लहान मोठे

कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वयाने मोठा असतो त्याचेकडून सतत कर्तृत्वाची आणि कर्तव्याची अपेक्षा केली जाते. केवळ वयाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व हौसे मौजेला मुरड घालावी लागते. पण हाच मोठा असलेला व्यक्ती जेव्हा लहानाला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र त्याचे लहान जर त्याचे ऎकत नसतील आणि मोठ्यांना योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल. आणि तेव्हा मग जर का मोठ्यांनी लहानांसारखे वागले तर त्यांना पुन्हा ऎकून घ्यावे लागते की "लहानांना मोठे होऊन मोठ्यांना समजवावे लागते आणि कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागते"
वयाने लहान असल्याचा प्रत्येक नात्यात गॆरफायदा घेतला जातो.
"हा नियम सगळ्या नात्यांना सारखाच लागू होतो"
मग ते कोणतेही नाते असो:
पिता-पुत्र, पिता-पुत्री, सासरे-जावई, सासू-सून, पती-पत्नी, भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ, बहीण-बहीण, नणंद-भावजय, मेहुणा-साळा.
आणि याला कारणीभूत असते परंपरागत चालत आलेली अंधपणाने पाळली जात असलेली मोठ्यांना बळीचा बकरा बनवणारी दांभिक शिकवण. मान आणि मोठेपणा न देता कर्तव्याची अपेक्षा कशी बरे करणार? आणि मोठयांची आज्ञा पाळायची वेळ लहानांवर आली की जर का असा विचार समोर येत असेल की "जमाना बदलला अाहे आता. कसले लहान आणि कसले मोठे? सर्व समान! ज्याचा अनुभव महान तो मोठा!" मग जर असे असेल तर मग कर्तव्य आणि हक्क सुद्धा दोघांनी समसमान वाटून घेतले पाहिजे. पण वरिल सर्व नात्यातील जर लहान हे मोठ्यांना योग्य मान देत असतील आणि आज्ञा पाळत असतील तर ते नाते अधिक दृढ होते यात शंकाच नाही.

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली