अँथ्रोपिक (Anthropic) ही अमेरिकेतील एक AI (Artificial Intelligence) कंपनी आहे. जशी OpenAI कंपनी ChatGPT चॅटबॉट बनवते, तशीच Anthropic ही कंपनी Claude (क्लॉड) नावाचा AI चॅटबॉट बनवते. (उदा. Claude 1, Claude 2, Claude 3 इ.). अँथ्रोपिक ही कंपनी जास्त सुरक्षित, जास्त विश्वासार्ह, आणि मानवाला उपयोगी असे AI बनवते. तसेच मोठ्या कंपन्या आणि डेव्हलपर्सना AI वापरायला API सुद्धा पुरवते. Claude हा अँथ्रोपिकचा AI असिस्टंट आहे: ChatGPT सारखाच. तो प्रश्नांची उत्तरे देतो, लेखन/अनुवाद करतो, कोडिंगमध्ये मदत करतो, सारांश काढतो, डॉक्युमेंट समजावतो. पण, अँथ्रोपिकचे ‘क्लॉड कोडेक्स’ हे साधन केवळ चॅटबॉट नसून ते संगणकावरील फाईल्स वाचणे, दस्तऐवज संपादित करणे आणि फाईल्सची मांडणी करणे अशी महत्त्वाची कामे करू शकते. हे टूल स्क्रीनशॉट्सवरून स्प्रेडशीट तयार करणे किंवा कच्च्या नोट्सवरून पूर्ण अहवाल बनवण्याचे काम अत्यंत वेगाने करते. क्लॉड कोडेक्स सारखे तंत्रज्ञान थेट संगणकाचा ताबा घेऊन मानवाप्रमाणे प्रक्रिया पार पाडत असल्याने, कंपन्यांना त्यांच्या पारंपरिक सेवांमध्ये मोठे बदल करणे अनिवार्य झाले आहे...
Comments
Post a Comment