क्रिकेटचे छगा आणि साळी

काळानुसार क्रिकेट मध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या, नाही का?

50 ओव्हरची मॅच 20 वर आली.

स्ट्राइकचा पण रेट मोजता यायला लागला आणि बॉलिंगचे स्पीड मोजता यायला लागले...

मानवी अंपायर पेक्षा निर्जीव थर्ड अंपायर च्या निर्णयाला महत्त्व आले...

पांढऱ्या स्वच्छ ड्रेस ऐवजी रंगीबिरंगी जाहिरातींनी रंगवलेले विविधरंगी ड्रेस आले...

विविध देशांतील खेळाडूंना एकत्र करून त्यांची खिचडी करून नवीन टीम तयार झाल्या...

कोमेंट्री (धावते वर्णन) "मराठीत" ऐकायला मिळायला लागले.

"बॅटसमन" गायब होऊन त्या जागी "बॅटर" कधी आला ते कळलंच नाही.

आणि "सिक्सरच्या मराठीतील शब्दाला" पर्यायी शब्द "छगा" कधी आला, काही कळलंच नाही, बघा!
😜

बाय द वे, "छगा" वरून मला उगाच "साळी" शब्द आठवला.
😁

आणि या सगळ्या गडबडीत चियर लीडर्स कुठे गायब झाल्यात ते समजलेच नाही...
💃🏻💃🏻 😆

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली