48 लॉज् ऑफ पॉवर
१. विरोधक
आपले स्पर्धक आणि शत्रू यानी केलेल्या चालींवर बऱ्याच वेळा स्वतःच्याच अतितीव्र प्रतिक्रियांमुळे आपण जास्त संकटे ओढवून घेतो. आपण जर तर्कसंगत राहिलो असतो तर अतितीव्र प्रतिक्रिया देण्याने निर्माण झालेल्या समस्या टाळू शकलो असतो.
उद्रेकी प्रतिक्रिया ही पडसादाचे अनेक आवर्त निर्माण करते. कारण तुमच्या उग्रभडक क्रियेमुळे शत्रूही उद्रेकी प्रतिक्रिया देतो.
प्रतिक्रिया देणे ही आपली अगदी स्वाभाविक, अंतःस्फूर्त प्रेरणा असते. एकाने आगळीक केली की दुसरा काहीतरी कुरापत काढून प्रत्युत्तर देतोच देतो.
पण आता यापुढे जेव्हा कोणी तुम्हाला ढकलले, धक्का दिला किंवा तुम्हाला विनाकारण चिडवले आणि डिवचले आणि "तुम्ही जोरकस प्रतिक्रिया देणार" असे तुम्हाला जाणवले की हे करून पाहा: "प्रतिकार करू नका. प्रतिहल्ला चढवू नका. सपशेल शरण जा. वाका!"
तुमच्या असे लक्षात येईल की, यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या वागण्यात तटस्थता येते आहे. तुम्ही सर्वशक्तीनिशी तुटून पडाल, प्रतिहल्ला कराल असा त्यांचा अंदाज असतो, तशी अपेक्षाही असते. पण आता तुम्ही प्रतिकार न केल्यामुळे गडबड उडून, गोंधळल्या स्थितीत त्यांच्यापाशी बचावाचे काही साधनही उरत नाही. वस्तुतः शरणागतीमुळे तुम्ही परिस्थितीवर ताबा मिळवता. ही शरणागती हा मोठ्या नियोजनाचा एक भाग असून, त्यांनी तुम्हाला नमवले आहे याची खात्री प्रतिस्पर्ध्याला पटते. त्यांचे सांत्वन त्यामुळे होते.
शरणागतीच्या कल्पनेचे हेच सुंदर सार आहे की आतून तुम्ही ठाम राहता आणि वरकरणी मात्र वाकलेले दिसता.
कोपिविष्ट होण्याचे कारणच आता विरोधकांना मिळत नसल्यामुळे उलट ते भांबावून जातात.
तुमच्या बाजूने अतितीव्र कृतीची मागणी असल्याने (व तुम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे तिच्या पूर्ततेची शक्यता नसल्याने) आता तुमचे विरोधक जास्त हिंसक प्रतिक्रिया देणे संभवत नाही. याउलट त्यांना नामोहरम करणारी विरुद्ध चाल रचण्यासाठी तुम्हाला अवकाश आणि अवधी मिळतो.
पाशवी आक्रमकतेविरुद्ध चातुर्याची लढाई जेव्हा सुरू राहते, तेव्हा शरणागती हे अनोखे हत्यार होऊन कामास येते.
बऱ्याच उदाहरणांमध्ये हे दिसून आले आहे की, शरण जाणे हे लढण्यापेक्षा श्रेयस्कर असते.
जास्त ताकदवान शत्रूच्या हाती पराभव निश्चित लिहिला गेला असेल तर, पळून जाण्यापेक्षा शरण जाणे हेच उत्तम! पळून जाण्यामुळे तात्पुरते तुम्ही तावडीतून सुटत असलात तरी यथावकाश आक्रमक शत्रू तुमचा माग काढत तुम्हाला गाठतोच. यापेक्षा शरण जाण्यामुळे शत्रुभोवती नंतर कोंडाळे करायची, जाळे विणायची संधी तुम्हाला मिळते.
२. दूधखुळा मुखवटा

दुसरा आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे, चतुर आहे, ही भावना असह्य असते. निरनिराळे युक्तिवाद करून आपण स्वतःला पुष्टी देत असतो.
उदाहरणार्थ:
"त्याच्याकडे नुसतेच पुस्तकी पांडित्य आहे पण माझ्यापाशी अनुभवातून आलेले शहाणपण आहे!"
"तिला चांगले शिक्षण मिळावे म्हणून तिच्यावर पालकांनी पैसा ओतलाय. माझ्या आई-बापांकडे इतके पैसे असते तर मलाही असे सगळे नशिबाने मिळाले असते"
"त्याला वाटते तितका काही तो स्मार्ट नाही!"
बव्हंशी लोकांच्या डामडौल-आत्मगौरवासाठी हुशारी वा प्रज्ञेची संकल्पना किती महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या. आता हे लक्षात आल्यानंतर अनवधानानेदेखील कुणा व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेचा अपमान वा त्याबद्दन संशय व्यक्त न करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असा प्रमाद हा अक्षम्य गुन्हा ठरतो. हे कठीण सूत्र तुमच्या हितासाठी तुम्ही प्रत्यक्षात राबविलेत तर त्यातून हिकमती व कपट कार्यसाधक होण्याचे अनेक मार्ग तुम्हाला खुले होतात.
लोकांच्या अर्धसुप्स जाणिवांना हा भरवसा द्या की ते तुमच्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहेत, किंबहुना त्यांच्या तुलनेत तुम्ही जरा मूर्खच आहात आणि मग सहजी त्यांच्या नाकात तुम्ही वेसण घालू शकता. बौद्धिक श्रेष्ठत्वाच्या तुम्ही त्यांना दिलेल्या भावामुळे त्यांचे संशयाचे बाहू निःशस्त्र होतात. आपण शेजारच्यापेक्षा जास्त मूर्ख असल्याची भावना कोणालाच आवडत नाही. मग युक्ती अशी आहे की ज्यांना लक्ष्य करायचे ते चतुर आणि हुशार आहेत असे भासवणे. नुसतेच हुशार नाही तर तुमच्यापेक्षा जास्त चुणचुणीत. एकदा त्यांची तशी खात्री झाली की, "तुमचे काही अंतस्थ हेतू आहेत!" असा त्यांना संशय येणार नाही.
"दूधखुळे वागून दुधखुळ्यांना आकर्षित करा. तुमच्या इयत्तेपेक्षा जास्त बुद्धू दिसा!"
३. तुमच्या वरिष्ठांपेक्षा जास्त चमकू नका!
सूत्र:
सूत्र:
वरिष्ठांशी संवाद अशा रीतीने साधा की, वरिष्ठ-भाव त्यांना सुलभतेने जपता यावा. वरिष्ठांना प्रभावित करण्याच्या किंवा खुश करण्याच्या तुमच्या ऊर्मीच्या भरात तुमची हुशारी वा सामर्थ्य यांचे प्रदर्शन करू नका. नाहीतर त्याचा नेमका उलटा परिणाम घडेल. अशाने वरिष्ठांच्या मनात असुरक्षितपणाची भावना आणि अनाम भीती घर करून बसते. तुमचे वरिष्ठ आहेत त्यापेक्षा अधिक हुशार वाटावेत, त्यांची छाप पडावी याकरिता झटा. सत्तेचे उत्तुंग शिखर काबीज करण्याचा हाच राजमार्ग आहे.
गुरुकिल्ली:
असुरक्षितता प्रत्येकालाच असते. जगातील तुमच्या गुणप्रदर्शनानंतर प्रत्येकाच्या मनात असूया, मत्सर, आकस यांची वलये निघू लागतात आणि हे स्वाभाविक आहे. पण जन्मभर इतरांच्या क्षुद्र भावनांची काळजी तुम्ही वाहू शकत नाही. तरीही वरिष्ठांशी वर्तन करताना तुम्ही वेगळा मार्ग अवलंबला पाहिजे. १४ वा लुई आणि मेडिसीस यांच्यापेक्षा आता जमाना बदलला आहे असे समजून स्वतःची फसगत करू नका.
उच्च सामाजिक-आर्थिक पातळीवर जे लोक आहेत ते एका अर्थी राजा-राणीसारखे असतात. त्यांच्या अवतीभवती असणाऱ्या लोकांपेक्षा जास्त बुद्धिमान, आकर्षक आणि चतुर अशा अलौकिकांमध्ये त्यांची गणना व्हावी अशी त्यांची इच्छा असते. आपले हे उच्चपद सर्वतोपरी सुरक्षित आहे याची हमी त्यांना वारंवार हवी असते.
वरिष्ठांचे मन जिंकण्यासाठी आपल्या दैवी देणग्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर फुशारक्या मारणे किंवा वल्गना करणे हे सर्वसामान्यतः दिसणारे चित्र असले तरी तेच फार घातक ठरते.
सर्व पत्ते उघड करून शेखी मिरवणे हीच सत्ता मिळवण्याच्या मार्गातील घोडचूक ठरते.
तुमच्या गुणप्रदर्शनामुळे वरवर तुमचे वरिष्ठ स्तुतीदेखील करतील, परंतु संधी मिळताक्षणी ते तुमची नक्कीच उचलबांगडी करतील करतील. नंतर या रिक्तपदी तुमच्यापेक्षा कमी हुशार, अनाकर्षक आणि निरुपद्रवी व्यक्तीची निवड ते करतील.
कधी कधी तुमच्या बाबतीत असेही घडू शकते की, अगदी स्वाभाविकरीत्या वागूनही कळत-नकळत तुम्ही तुमच्या वरिष्ठांपेक्षा जास्त चमकता. असेही काही वरिष्ठ आहेत की जे कमालीच्या सुरक्षिततेमध्ये जगत असतात. तुमच्या अंगभूत सौंदर्यामुळे, अशा वरिष्ठांसमोर तुमची छाप पडणे अपरिहार्य असेल तर असल्या पोकळ धेंडांपासून दूर राहण्याचे कसब शिका किंवा त्यांच्या सहवासात छाप पाडणारे तुमचे गुण लपविण्याची काळजी घ्या.
दुसरे म्हणजे तुमचे वरिष्ठ तुमच्याशी सलोख्याने वागत आहेत, याचा अर्थ तुम्हाला मनमानी करण्याची मुभा आहे, असा होत नाही.
आपले अधिकार गृहीत धरून जादा वर्तन केल्यामुळे वरिष्ठांच्या मर्जीतल्या भल्याभल्यांनाही रोष आणि खप्पामर्जी सोसावी लागली आहे. अशा आगाऊ वागणुकीने विचका झालेल्या उदाहरणांची एक गाथा होईल, इतके असंख्य आणि ठळक किस्से उपलब्ध आहेत.
आपल्या वरिष्ठांपेक्षा जास्त चमकण्यातील संभाव्य धोके ध्यानात घ्या. योग्य वापर केल्यास हेच सूत्र तुमची ताकद बनू शकेल.
पहिले पथ्य म्हणजे, तुमच्या वरिष्ठांची स्तुती करा. त्यांना फुशारकीने फुगू द्या. सर्वासमक्ष तोंडावर केलेली स्तुती उपयोगाची असते, पण तिला मर्यादा आहेत. ती फारच उघड-उघड, अध्याहृत असते. तसेच इतर सहकारी व ज्येष्ठांना न रुचणारी ठरते. यापेक्षा गुप्ततेत केलेली स्तुती ही जास्त प्रभावी होय.
उदाहरणार्थ, तुम्ही जर तुमच्या वरिष्ठांपेक्षा जास्त बुद्धिमान असाल तर प्रत्यक्षात मात्र नेमके उलटे चित्र उभे करा.
तुमचे वरिष्ठ तुमच्यापेक्षा जास्त कुशल, बुद्धिमान दिसू देत. भोळसटपणाचा बुरखा ओढा. तुम्हाला त्यांच्या नैपुण्याची गरज आहे, असे दाखवा. अ-गंभीर, नुकसान न करणाऱ्या चुका करा. तुमच्या कारकीर्दीला क्षती पोहोचणार नाही, पण वरिष्ठांकडे मदत मागण्याची संधी त्यातून तुम्हाला मिळेल अशा स्वरूपाच्या चुका करा. या प्रकारच्या विनंतीला दाद देणे वरिष्ठांना फार आवडते
आपल्या अनुभवाची अनमोल भेट जो वरिष्ठ तुम्हाला देऊ शकत नाही, तो थेट चुरशीच्या भावनेतून हाडवैर धरू शकतो. तुमच्याबद्दल मनात दुष्टावा बाळगू शकतो. तुमच्या कल्पनांमध्ये जास्त निर्माणक्षमता असेल तर जितके जाहीररीत्या शक्य आहे, तितक्या जाहीरपणे प्रस्तुत कल्पना या तुमच्या वरिष्ठांच्या आहेत असे सांगा. तुमचा सल्ला हा त्यांच्या सल्ल्याचा प्रतिध्वनी आहे हे मात्र स्पष्ट करत चला.
जर उपजतच तुम्ही तुमच्या वरिष्ठांपेक्षा जास्त दिलदार असाल, सर्वांच्यात मिसळणारे असाल तर याची खात्री करून घ्या की, वरिष्ठांची प्रभावळ इतरांपासून झाकून ठेवणारे मळभ तर तुम्ही होत नाही ना? नभोमंडळातील इतर ग्रह जसे सूर्याभोवती फिरतात तसेच दरबारातील सर्व लोकांचे सज्ज असे रिंगण वरिष्ठांच्या भोवती घुटमळले पाहिजे आणि वरिष्ठांची ताकद, ज्ञान, क्षमता झळकली पाहिजे. आकर्षणाचे तेच एकमेव केंद्र राहिले पाहिजे.
सरतेशेवटी सत्तेची सूत्रे आणि उच्चाधिकारांची प्राप्ती ज्यातून होते त्या त्या सर्व बाबींमध्ये काही काळापुरती तुमची ताकद पदराआड झाकून ठेवली म्हणून तो दुबळेपणा ठरत नाही. इतरांना तुमच्यापेक्षा जास्त चमकू देण्यात तुमच्यावर संयम राहतो आणि इतरांच्या असुरक्षिततेच्या भावनेपोटी तुमचा कडेलोट होऊन सर्वनाश होण्यापेक्षा सबुरी आणि संयम हे केव्हाही चांगलेच!
तुमच्या कनिष्ठ अवस्थेतून एक पाऊल पुढे जाण्याचा (वर उठण्याचा) निश्चय तुम्ही ज्या दिवशी कराल, त्या दिवशी वरील सर्व युक्त्या तुमच्या कामी येतील, उपयुक्त ठरतील. खास करून इतरांच्या नजरेसमोर तुमच्या वरिष्ठांची प्रभा जास्त झळकावी यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहिलात तर, तुम्ही जणू ईश्वराने पाठविलेले प्रेषित ठरता. हीच तुमच्या त्वरित बढतीची नांदी ठरते.
रूपक: आकाशातील तारे.
एका वेळी एकच सूर्य आकाशात असतो. सूर्यप्रकाश झाकोळून टाकू नका किंवा सूर्याच्या तेजाशी चुरसही लावू नका. यापेक्षा आकाशात विरघळून जा आणि सर्वोच्च अशा सूर्याचे तेज आणि ऊर्जा जास्त वाढेल याकरिता निरनिराळे मार्ग शोधा.
संदेश:
वरिष्ठांपेक्षा जास्त चमकणे टाळा. वर्चस्वापाठोपाठ द्वेष येतो हे खरे आहे, परंतु एखाद्या राजपुत्रावर त्याच्याच प्रजेने दाखविलेले वर्चस्व हे केवळ मूर्खपणाचे नसून दुर्दैवी ठरते. आकाशातल्या ताऱ्यांचे सूर्याशी नाते असते, काही काही तारे तर सूर्यापेक्षाही जास्त तेजस्वी असतात, पण ते कधीच सूर्याच्या सहवासात चमकत नाहीत. हाच अनमोल धडा तारे शिकवितात असे बाल्टसर ग्रेशियन हा तत्ववेत्ता (१६०१-१६५८) सांगून गेलाय.

Comments
Post a Comment