अशीही प्रस्तावना

एका पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेली सूचना:

या पुस्तकातल्या कथेत लेखकाने व्यक्त केलेल्या मतांशी स्वतः लेखक तसेच प्रकाशक, मुद्रक आणि विक्रेते हे सर्व सहमत असतीलच असे नाही. वाचकांनीही सहमत असावे असे नाही.

तसेच या पुस्तकातील पात्रे, घटना, व्यक्ती हे सर्व सत्य आहेत. ते वाचकास खोटे वाटत असतील तर तो दोष वाचकाचा आहे आणि हा योगायोग मानू नये. कारण, माझा योगायोगावर विश्वास नाही.

तुमचा असल्यास तो एक योगायोग मानावा.

हे पुस्तक खालील अटींसह विकले गेले आहे :

या पुस्तकाचे सर्व हक्क प्रकाशकाधीन आहेत. या पुस्तकाचे इतरांसमोर वाचन, मनन, पठण, चिंतन करू नये. तसेच याची मनातल्या मनात झेरोक्स काढू नये. तसे कुणी करतांना आढळल्यास वाचकाचा मनाला लगाम घालण्यात येईल. हे पुस्तक फक्त आणि फक्त एकट्याने वाचावे. दुसऱ्या कुणाला वाचायला देवू नये. नाहितर ते जप्त करण्यात येईल. त्याऐवजी त्याला विकत घ्यायला उद्युक्त करावे.

पुस्तक : योग आणि योगायोग (एका विनोदी आत्म्याचे चारित्र्यहीन आत्मचरीत्र)

लेखक : श्री. सत्यव्रत सत्यवचने

प्रकाशक : श्री. सत्यव्रत सत्यवचने

मुद्रक : श्री. सत्यव्रत सत्यवचने

विक्रेते : श्री. सत्यव्रत सत्यवचने

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली