पाश्चात्य संस्कृती हा शब्द भौगोलिक आहे की प्रतीकात्मक?

एक प्रश्न मला नेहेमी पडतो. आपण भारतीय म्हणत असतो की, आपल्यावर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत चालला आहे बगैरे वगैरे. येथे मला कोणती संस्कृती चांगली आणि कोणती वाईट या वादात शिरायचे नाही.माझा प्रश्न खुप वेगळा आहे. जगाचा नकाशा थोडा डोळ्यासमोर आणला तर पूर्वेला (युरोप आणि अमेरिकेच्या पूर्वेला) फक्त भारत हा एकमेव देश नाही, तर जापान, चीन, थायलंड, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, मंगोलिया, कोरिया, मलेशिया हे ही देश आहेत. मला आता असे म्हणायचे आहे की, हे सगळे देश सांस्कृतिक बाबतीत तर जवळपास युरोप आणि अमेरिकेसारखेच आहेत. म्हणजे, ढासळती कुटुंब व्यवस्था,खुले सेक्स विचार आणि पराकोटीचे व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे असलेले देश. मग, आपण पाश्चात्य पाश्चात्य म्हणून जे रडगाणे गात असतो ते भौगोलिक दृष्ट्या चुकीचे आहे का? की, या सगळ्या देशांत (म्हणजे पौर्वात्य) पण आपल्यासारखीच नातेसंबंध, एकत्र कुटुंबपद्धती, सासू-सून-नणंद-भावजयी वगैरे वगैरे प्रकार आहेत? हे सगळे देश भारताच्या पूर्वेला आहेत आणि तरीपण या देशांची संस्कृती पाश्चात्यांसारखीच आहे. पण या सगळ्या देशांच्या पश्चिमेला भारतासह इतर सगळे देश (युरोप अमेरिकेसह) आहेत. म्हणजे जापान साठी भारत हा पाश्चात्य देश झाला.

मग माझा प्रश्न असा आहे की, पाश्चात्य संस्कृती म्हणजे नेमके काय? हा शब्द भौगोलिक दृष्ट्या (दिशादर्शक) आहे की, फक्त प्रतीकात्मक आहे?

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली