मुलींना जसा आई-वडीलांच्या संपत्तीत "वाटा" हवा असतो तसाच त्यांच्या आजारपणाच्या खर्चाचा "वाटा" सुद्धा त्यांनी उचलावा!!!

आज स्त्री पुरुष समानतेचे जरा जास्तच स्तोम माजवले जात आहे. समानतेचा मूळ विधायक उद्देश मागे पडून फक्त पैसे आणि वाटणी (हक्क) मिळवण्यासाठीच त्याचा फक्त वापर केला जातो.
मुलगी मुलाच्या बरोबरीने वडीलांच्या संपत्तीत वाटा मागते -- हक्क!
पण आई-वडीलांची आजारपणं, त्यांना सांभाळणं, त्यावारचा खर्च हा सगळा "वाटा" फक्त मुलगाच उचलतो. --कर्तव्य !
तेव्हा कुठे जाते ही समानता?
मुलींना संपत्तीत वाटा असतो तसाच आई-वडीलांच्या आजारपणाचाही, त्याला लागणाऱ्या खर्चाचाही "वाटा" त्यांनी उचलावा, असा कायदा आहे का? नसल्यास तो करायला हवा.
मध्यंतरी एक कायदा आला की, आई-वडीलांना मुलांनी सांभाळले पाहिजे. बरोबरच आहे. पण त्यात बदल करून कायदा असा हवा-
"मुलाने आणि मुलीने सारख्याच प्रमाणात आई-वडीलांना सांभाळावे. नाहीतर कारवाई केली जाईल. दोघांवरही...."
कारण आई-वडील मुलाला जसे शिक्षण देतात, तसेच मुलीला ही देतात. त्यावारच ती नोकरीही करत असते. पुन्हा मुलीच्या लग्नाला भरमसाठ खर्च येतो तो वेगळा....तसेच, हुंडा किंवा इतर गोंडस नावाखाली लग्नानंतरही सतत येणाऱ्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतात...
समानता ही हक्क आणि कर्तव्य या दोघांबाबत असायला हवी. नाही का?
आपल्याला काय वाटते?

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली