हनुमान रिटर्न्स- अदभुत कल्पनाशक्ती

हनुमान रिटर्न्स : पूर्ण कार्टून स्वरूपात असलेला हा चित्रपट. कार्टून चित्रपट लोकप्रिय होत आहेत ही एक चांगली गोष्ट! अदभुत कल्पनाशक्ती!

जसे : "माय फ्रेंड गणेशा" मध्ये बाल-गणेश हिमालयात बर्फावर स्केटींग करतांना दाखवलेला आहे.

हनुमान रिटर्न्स मध्ये आजच्या जगात जर हनुमान पृथ्वीवर आला तर काय धमाल होईल हे यात चांगल्या पद्धतीने दाखावलेले आहे. हे दाखवतांना दिग्दर्शकाने पुराणातील काही कथांचा, पात्रांचा अगदी योग्य ठीकाणी, योग्य प्रकारे वापर करून घेतलेला आहे. जसे, शुक्रचार्य, शुक्र ग्रहावर राहाणारे सगळे दानव, शुक्र ग्रहावरील "शुक्र टि. व्ही." आणि त्यावरील बातम्या एकदम झकास! शुक्र ग्रहावरचे राहू-केतू, त्यांच्या भांडणामूळे चुकून पृथ्वीवर पडलेली सर्पदंड, त्याला मिळवण्यासाठी जी धमाल उडते ती बघण्यासारखी! अधून मधून गब्बर येतो आणि तोही धमालच करतो. हा गब्बर कधी अमजद खान तर मधूनच संजीव कुमार होतो, तर कधी तो अमिताभ होतो.

हनुमान ब्रम्हदेवाजवळ पृथ्वीवर जाण्याची ईच्छा व्यक्त करतो. आजच्या काळातला चित्रगुप्त लॅपटॉप वर हनुमानासाठी एक काँट्रॅक्ट तयार करतो. त्यात पाच अटी असतात. ही मूळ कथा कल्पना खुपच छान. हनुमानाला खायला खुप लागतं, ह्या कल्पनेचाही छान वापर केलेला आहे. अनुराग कश्यपांनी छान चित्रपट दिला आहे. ऍनिमेटर्स ची तर कमाल! प्रत्येक पात्र अगदी छान चितारण्यात आलेले आहे. राहू-केतू तर एखाद्या कॉमिक्स मधल्या पात्रांसारखेच दिसतात. क्लायमॅक्स मध्ये मात्र थोडी खालील हॉलिवूड चित्रपटांची या चित्रपटावर छाप जाणावते : वोल्कॅनो, ट्वीस्टर, द डे अफ्टर टुमारो वगैरे.

या चित्रपटातील सगळी गाणी ही खुपच छान. खासकरून : " आसमां को छूकर देखे ..." हे गाणे ऐकायला आणि बघायलाही छान! ह्या गाण्यावर मला खासकरून प्रत्येकाची प्रतिक्रीया हवी आहे.

मी स्वतः माझ्या मुलासोबत हा चित्रपट दोनवेळा बघितला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी पुन्हा पुन्हा बघावा असा हा चित्रपट आहे. आपणही जरूर बघावा आणि त्याबद्दल आपले विचार येथे मांडावेत हा या चर्चेचा हेतू. जरूर जरूर बघावा असा हा चित्रपट....!!

Comments

Popular posts from this blog

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली

आरोग्यदायी सांबार