कर्माची ढाल



रात्र मुंबईच्या रस्त्यांना हळूहळू गिळत होती. वाशी ब्रिजवरून वाहणाऱ्या वाहनांना पुलाखालच्या समुद्राच्या सौम्य लाटा जाणवत होत्या. ब्रिजवरून धावणाऱ्या तुरळक गाड्यांच्या हेडलाइट्सच्या प्रकाशात अक्षयची बाईक वेगाने सुसाट पळत होती. 


अक्षय, एक बिघडलेला तरुण, जो दिवसभर ऑफिसच्या तणावात घालवून मग रात्री मदिरेच्या आणि मदिराक्षीच्या नशेत स्वतःला बुडवून घ्यायचा. आजही त्याचे बारमध्ये जास्तच पिणे झाले होते. आज त्याने थोडेसे ड्रग्जही घेतले होते. हेल्मेट न घालता, बेधुंद होऊन तो बाईकवरून आपल्या एका गर्लफ्रेंडच्या फ्लॅटकडे वेगाने जात होता. बाईकवर त्याने P अक्षर कोरले होते. त्याची सगळ्यात आवडती आणि सुंदर गर्लफ्रेंड, प्रणिता.


"आजची रात्र प्रणिताकडे !" तो मोठ्याने ओरडला, वाऱ्याने त्याचे केस उडत होते. ते केस तो एका हाताने स्टाईल दाखवत मागे सारत होता. खूप पैसे कमवून वेगवेगळ्या गर्लफ्रेंडवर रात्री उडवणे हाच त्याचा सध्या छंद बनला होता.


***


हजारो वर्षांपूर्वी, हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एका प्राचीन राज्यात, राजा भीमराज राज्य करत होता. त्यांचे दोन मुलगे, पर्वतेश्वर आणि भुवनेश्वर हे राजाच्या दोन राण्यांचे पुत्र होते. एक आवडती आणि दुसरी नावडती. 


पर्वतेश्वर, हा राजाच्या दोन नंबरच्या म्हणजे आवडत्या राणीचा पुत्र होता. 


भुवनेश्वरपेक्षा वयाने लहान, बंडखोर, दुर्गुणी आणि महत्वाकांक्षी, जो नेहमी राज्याच्या वारसाहक्कासाठी हपापलेला होता. 


भुवनेश्वर, मोठा पण निडर, सद्गुणी आणि न्यायी, जो आपल्या भावाच्या महत्वाकांक्षांना ओळखू शकत नव्हता कारण त्याच्या मनात डावपेच नव्हते. कारण तो भोळा होता. आपण जसे साधे सरळ आहोत तसेच इतर सुद्धा आहेत अशी त्याची धारणा होती. राज्याच्या प्रजेमध्ये मात्र भुवनेश्वर खूप लोकप्रिय होता.


***


ब्रिजच्या एका कडेला सुनीलची कार उभी होती. सुनील, गरिबीतून वर आलेला, एक यशस्वी बिझनेसमन, जो आपल्या कारमध्ये बसून मोबाईल फोनवर बोलणे सुरू करणार होता. 


गाडी चालवत असताना ब्लूटूथ जरी असले आणि स्पीकरवर बोलता येत असले तरी सुनील तसे करणे टाळायचा. त्याला एकदम महत्त्वाचा कॉल आला होता, म्हणून त्याने गाडी थोड्या वेळासाठी बाजूला उभी केली होती. 


"हो, मी येतोच आहे, थांबा. आपले हे डील होणारच!" असे म्हणून बोलत असताना, त्याने कारचा दरवाजा उघडला, जेणेकरून तो उभा राहून समुद्राकडे पाहत फोनवर बोलू शकेल.


***


"पर्वतेश्वर, भुवनेश्वर, तुम्हा दोघांना मी संयुक्त मोहिमेवर पाठवतो आहे," राजा भीमराजने दरबारात घोषणा केली. 


"शत्रू राज्याच्या सीमेवर जा. शेजारच्या राज्याने युद्ध पुकारले आहे. तुम्ही दोघे एकत्र लढा, आणि विजयश्री खेचून आणा" 


पर्वतेश्वरने डोके झुकवले, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. 


"जशी आज्ञा, पिताश्री," तो म्हणाला. 


भुवनेश्वरने उत्साहाने म्हटले, "मी आणि माझा भाऊ एकत्र लढू, आणि शत्रूला धूळ चारू!"


पर्वतेश्वर आपल्या भावाच्या भोळेपणावर कुत्सितपणे तोंड तिरपे करून हसत होता.


***


सुनीलला वाटले नव्हते की मागून इतक्या वेगाने कोणी बाईकवर येत असेल. पण तेवढ्यात अक्षयची बाईक सुसाट आली. 


"अरे, हे काय!" अक्षय ओरडला, त्याने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, पण दारूच्या नशेत आणि बाईकच्या प्रचंड वेगामुळे त्याला ते नीट जमले नाही.


धडाम! अक्षयची बाईक सुनीलच्या कारच्या दरवाज्यावर जोरात आपटली. त्याचे नाक, चेहरा आणि डोके दरवाजाला आपटले गेले. अक्षय हवेत उडून उलटापालटा झाला. 


सोबत तो दरवाजाही उखडला गेला आणि हवेत उडून वरच्या दिशेने उडाला. अक्षयची नशा खाडकन उतरली.


***


युद्धाचे मैदान रक्तरंजित होते. घोड्यांच्या खुरांच्या आवाजात, तलवारींच्या टणटणाटात, सैनिक एकमेकांवर तुटून पडत होते. पर्वतेश्वर आणि भुवनेश्वर दोघे पुढे होते. भुवनेश्वरने आपली तलवार फिरवली, "पर्वतेश्वर, मागे पाहा! शत्रू येत आहेत!" तो ओरडला. 


भुवनेश्वरच्या इशाऱ्यामुळे पर्वतेश्वर शत्रूच्या वारापासून वाचला. पर्वतेश्वरने आभार व्यक्त करणारे डोके हलवले, पण त्याच्या मनात वेगळेच होते. नंतर तो गुपचूप मागे सरकला.


युद्धाच्या धुमश्चक्रीत, सगळ्यांच्या बाजूला एक छोटी तुकडी लढत होते. आजूबाजूला झाडी होती. घोड्यावर बसलेल्या पर्वतेश्वरने, खाली जमिनीवर लढत असलेल्या भुवनेश्वरच्या नकळत मागे येऊन, घोड्यावरून उतरून आपली मजबूत ढाल उगारली. 


"भुवनेश्वर, सावधान! शत्रू सैनिकाचा वार वाचव" तो ओरडला, पण ते बनावट होते. भुवनेश्वरने मागे पाहिले आणि पर्वतेश्वरच्या ढालीचा जोरदार प्रहार खालून वर असा भुवनेश्वरच्या हनुवटीवर बसला. त्यानंतर पटकन पर्वतेश्वर घोड्यावर बसला आणि आणि मग वरून खाली असा भुवनेश्वरच्या डोक्यावर ढालीचा वार केला. मग अनेक वार केले.


"आह! भैया तू? का?" भुवनेश्वर खाली कोसळला, त्याचा चेहरा वेदनेने व्यथित झाला. 


"पर्वत... तू... तू हे काय केलेस? का केलेस?" तो रक्त ओकत असताना कुजबुजला.


पर्वतेश्वरने ढाल पटकन बाजूला केली आणि घोड्यावर स्वार होऊन बाकीच्या इतर लोकांना ओरडून खोटे खोटे सांगू लागला आणि ओरडला, "शत्रूने माझ्या भावाला मारले! मी आता सूड घेतो!" आणि पुढे निघून गेला, जणू काही घडलेच नव्हते. 


भुवनेश्वरच्या शेवटच्या श्वासात तळतळाट मिसळला. 


"पर्वतेश्वर... माझा भाऊ... का केलेस असे? राज्यासाठी?" तो शेवटचा श्वास घेत म्हणाला. 


"कर्म... कर्म तुला सोडणार नाही." आणि त्याचा जीव गेला. 


युद्ध संपले, पर्वतेश्वर विजयी म्हणून परतला, आणि राज्याचा वारसा त्याला मिळाला. 


***


हवेत उडत असताना, सगळे जणू काही स्लो मोशनमध्ये घडत असल्यासारखे अक्षयला वाटू लागले. काळाची गती जणू मंदावली होती. अक्षयसाठी! 


जो कारचा दरवाजा, उखडला गेला होता, त्यावर सुनीलच्या कंपनीचा लोगो चितारलेला होता. त्या लोगो मध्ये एक ढाल होती आणि त्यावर B हे अक्षर कोरलेले होते आणि B अक्षराच्या वरच्या भागातून ढालीत एक तलवार घुसलेली होती. बिना हे सुनीलच्या बायकोचे नाव होते. सुनीलची कंपनी आर्मीसाठी शस्त्रास्त्र निर्मिती करायची. त्याचा तोच बिझिनेस होता.


अक्षयला तो हवेत उडून त्याच्या दिशेने येणारा दरवाजा लोगोमुळे जुन्या काळातील ढालीसारखा दिसू लागला. त्याचा चेहरा जखमी झाला होता, रक्त वाहत होते, पण त्याच्या मनात एक वेगळीच आठवण उमटली. 


"हे... हे काय आहे? काहीतरी ओळखीचे आहे!" तो स्वतःशीच म्हणाला. 


आणि मग, जणू वेळ थांबली, आणि त्याला मागचा जन्म आठवू लागला. 


प्राचीन, ऐतिहासिक काळ, एक राज्य, दोन राजकुमार, युद्ध, घात! 


ज्यात तो पर्वतेश्वर होता, आणि सुनील... भुवनेश्वर. 


लोगोमधल्या ढालीतला B. भुवनेश्वर??


त्याच्या डोळ्यासमोर दरवाज्याला आपटण्याआधी, जेव्हा काही क्षणांसाठी फोनवर बोलणाऱ्या सुनीलचा चेहरा आला होता तेव्हा, त्याला हलकेसे काहीतरी आठवले होतेच. 


तो तोच चेहरा होता, भुवनेश्वरचा! 


या जन्मात दोघेही मागच्या जन्मातील चेहरेपट्टी घेऊनच जन्माला आले होते.


सुनील मात्र अक्षयचा चेहरा पाहू शकला नाही.


"तो... तो माझा भाऊ होता... मी त्याला मागच्या जन्मी मारले?" अक्षयच्या मनात विचार आला. कारचा दरवाजा, जो त्याच्यासोबत हवेत उडाला होता, तो बरोबर त्याच्या हनुवटीला खालून वर जोराने येऊन आदळला. आणि मग आणखी वर उडून वरून खाली त्याच्या डोक्यावर आदळला. जखमी चेहऱ्यावरून खाली सरकला आणि खाली समुद्रात पडला. 


"सुनील... तू भुवनेश्वर... मी पर्वतेश्वर... हे कर्म आहे, मला माफ कर", तो हवेतून सुनीलला हातवारे करून ओरडून सांगू लागला. 


खरे तर हे सगळे फक्त काही क्षणात घडले, पण तेवढा काळ अक्षयला खूप मोठा भासला.


सुनील ब्रिजवर उभा राहून वर पाहत होता. आपल्या बाईकसह अक्षय समुद्रात कोसळला.


"अरे, कोण होता तो? मी... मी हे नकळत काय केले?" तो स्वतःशी हात थरथरत अपराधी भावनेने म्हणाला. त्याचा मोबाईल हातातून गळून खाली पडला होता. 


सुनीलच्या मनात विचा

र आला, "तो मला हवेत उडत असतांना काय सांगत होता? ईश्वर... ईश्वर... कर्म... कर्म असे काहीतरी म्हणत होता का??"



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली